मुकुलकुमार दास यांचा वडणगे गावातील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कोल्हापूर दि. २९
बी जैन फार्मा चे कंट्री हेड आणि एस डी आर एम् हिलींग आर्टस् प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. मुकुलकुमार दास यांनी आज कोल्हापुरातील पूरग्रस्तांना भेट दिली. यामध्ये प्रामुख्याने वडणगे गावातील पुरग्रस्तांसाठी अन्नधान्य व खाद्यपदार्थ वाटप करून त्यांनी विशेष मदत देऊ केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली व हजारो कुटुंब बेघर झाली. या आपत्कालीन परिस्थितीतून नुकतंच शहर सावरत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. कोल्हापुरातील वडणगे गावालाही यावेळी बेटाचं स्वरूप आले होते यामध्ये सुमारे एकशे पन्नास कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले होते. अशा सर्व कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी एक मदतीचा हात म्हणून श्री. दास यांनी आज वडणगे गावाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व खाद्यपदार्थांचे वाटप केले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्यराज सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच श्री. सुरज पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री. सुनील परीट, डॉ. ऋषीकेश जाधव, डॉ. श्रद्धा जाधव, डॉ. प्रणव पाटील आदी उपस्थित होते.
बी जैन फार्मा चे कंट्री हेड मुकुलकुमार दास यांचा पूरग्रस्त मदत कार्यासाठी सहकुटुंब कोल्हापूर दौरा*
निमा करवीर च्या वैद्यकीय पथकाला पुरवली औषधे
कोल्हापूर दि. १७
बी जैन फार्मा दिल्ली चे कंट्री हेड श्री. मुकुलकुमार दास व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी दास यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज कोल्हापूर दौरा केला. यावेळी कोल्हापुरात विशेष सक्रिय असलेल्या निमा करवीर च्या वैद्यकीय पथकाला त्यांनी भेट दिली व मुबलक प्रमाणात औषधे आणि सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिली.
याप्रसंगी निमा महाराष्ट्र राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा येथील निवृत्त प्रोफेसर डॉ. प्रकाश भुजबळ, एस. डी. आर. एम. हिलींग आर्टस सातारा चे डॉ. साईश भुजबळ, निमा करवीर चे माजी अध्यक्ष डॉ. अभिजीत मुळीक, सचिव डॉ. सुजित पाटील, डॉ. आदित्य काशीद, डॉ. प्रणव पाटील, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. श्रद्धा जाधव, आणि डॉ. ऋषीकेश जाधव आदी उपस्थित होते.
WhatsApp us